वसई नऊ वर्षांपासून सुरू असलेला पत्रव्यवहार, मागणीविनंती अर्ज आदी प्रयत्नांनंतर अखेर वसईच्या अंगणी पाईपलाईन गॅसगंगा अवतरली. वसईच्या एव्हरशाईन नगर या रहिवासी संकुलात जिल्ह्यातील पहिलीवहिली पाईपलाईन गॅस जोडणी मंगळवारी झाली आणि वसईकरांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. पाईपलाईन गॅससाठीच्या या लढ्यात बहुजन विकास आघाडीने शर्थीचे प्रयत्न केले होते. via Sudarshannews.in https://www.sudarshannews.in/news-detail.aspx?id=14398